Nashik News  saam tv
Video

Nashik News: मनसैनिकांनी गोदावरी नदीत मारल्या धडाधड उड्या|VIDEO

Jump Into Godavari River: नाशिकमध्ये मनसे पुन्हा एकदा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे, गोदावरीनदीत वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या गोदावरीवर प्रचंड खर्च होऊनही ती स्वछ का झाली नाही,तसेच प्रशासनाने या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे गोदावरीचे पावित्र्य संकटात सापडले असून गोदावरी प्रदूषणाच्या मुद्यावरून शेतकरी, साधू संत यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दोन दिवसापूर्वी दिला होता.

आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात गोदावरी नदीमध्ये धडाधड उड्या मारून आंदोलन करण्यात आले. मनसे गुढीपाढवा मेळाव्यात राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत नद्यांची झालेली अवस्था दाखवली होती. यानंतर मनसे आक्रमक झाली आहे, 2027 ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून नदीवर झालेली पानवेली, गोदावरीत सोडले जाणारे दूषित पाणी या सगळ्याच्या निषेधार्थ मनसे पदाधीकाऱ्यांनी नदीत उडी मारून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT