Dirty Noodles Making video Saam tv
Video

Dirty Noodles Making video : तुम्ही खाताय डर्टी नुडल्स? गलिच्छ जागेत बुरशीजन्य पिठातून नुडल्स निर्मिती, धक्कादायक व्हिडिओ पाहिलात का?

Dirty Noodles Making video at kamothe : कामोठ्यातील एका कंपनतीत गलिच्छ जागेत बुरशीजन्य पिठातून नुडल्स निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले आहे. मनसेने धाड टाकून ही बाब उघडकीस आणली आहे. यानंतर मनसेने कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई :

पनवेलजवळील नूडल्स बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेने पुन्हा एकदा धाड मारली. काही दिवसांपूर्वी देखील मनसेने धाड टाकत या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. मंगळवारी मध्यरात्री मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा नुडल्स निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली. अतिशय घाणेरड्या जागेत, बुरशीजन्य पिठाच्या माध्यमातून हे नूडल्स बनवले जातं असल्याचे समोर आलं आहे. या कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामोठ्यामधील कुमार फुड प्रोडक्ट्स ही रेड चिली सॉस, सोया सॉस बनवणारी खाद्य कंपनी ग्राहकांच्या जिवाशी खेळत असल्याचं समोर आलं आहे. मनसेने कंपनीतील नुडल्स निर्मितीचे घाणेरडे वास्तव समोर आलं आहे. एफडीएने या कंपनीवर कारवाई केली नसल्याचा मनसेचा आरोप आहे. एफडीएच्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा रात्रीच्या अंधारात नुडल्स निर्मिती सुरू आहे? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT