मुंबईसह राज्यात मनसेकडून छटपूजेला विरोध होत असताना आता पक्षाच्याच नगरसेविकेने छटपूजेचे आयोजन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईच्या मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरात मनसेच्या वतीने छटपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नगरसेविका सुरेखा परब आणि त्यांचे बंधू तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष भास्कर परब यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. छटपूजेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, परिसरात छटपूजेच्या स्वागताचे मोठमोठे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईतील छटपूजेच्या आयोजनावर आक्षेप घेतला जात असताना दुसरीकडे पक्षाच्याच नगरसेविकेकडून छटपूजेचे आयोजन करण्यात आल्याने पक्षातील भूमिकेतील विरोधाभास समोर आला आहे. त्यामुळे मनसेच्या या दुहेरी भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.