Kalyan News Saam tv
Video

Raju Patil : मनसे आमदार करणार महाविकास आघाडीला मदत; राजू पाटलांच्या वक्तव्याने खळबळ, VIDEO

Raju Patil latest News : मनसे आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार आहे. राजू पाटील यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणूक रंगात आलीय. त्यातच शिंदे गटाने कल्याण ग्रामीणमधून मनसेच्या राजू पाटलांविरोधात उमेदवार दिलाय. त्यामुळे नाराज झालेल्या राजू पाटलांनी थेट अंबरनाथमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडेंना पाठींबा देण्याची भूमिका घेतलीय. तर मनसैनिकांकडून मदतीचा विश्वास वानखेडेंनी व्यक्त केलाय.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. एवढंच नाही तर राज ठाकरेंनी शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या. मात्र आता विधानसभा निवडणूकीत शिंदेंच्या भुमिकेमुळे मनसे नेते नाराज झालेत.

अडीचशे जागा लढवण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला अवघे 135 उमेदवारच रिंगणात उतरवले आहेत. एवढंच नाही तर मनसेच्या पाठींब्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.. दरम्यान शिंदेंनी मनसेच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देत चुरस वाढवलीय.

मात्र दुश्मन का दुश्मन दोस्त अशी भूमिका घेत मनसे आमदार राजू पाटलांनी ठाकरे गटाला पाठींबा देण्याची भूमिका घेतली. मात्र राज ठाकरे ऐनवेळी मनसैनिकांना काय आदेश देणार? याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Remedy: कॉफी किंवा कोको पावडरने पांढरे केस होतील गायब, आत्ताच वाचा ट्रिक

Indian Navy Recruitment: १२वी पास तरुणांसाठी खुशखबर; भारतीय नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

१५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर बंद, गॅस सिलेंडरच्या तुडवड्यामुळे मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: जळगावात जिल्ह्यात यलो अलर्ट, जळगावात उष्णतेची लाट

Om Birla: अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर संतापले; रविशंकर यांनी दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT