Raj -Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
Video

Raj Thackeray: 'मातोश्रीला चाललोय...' राज ठाकरेंनी युतीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाले...

MNS Chief Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना, नुकतंच राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Bhagyashree Kamble

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अलिकडेच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एक सूचक विधान केलं, 'मी तुम्हाला बातमीच देणार आहे', असं म्हटलं होतं. त्यामुळे ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे चित्र ‘ठाकरे सोबत ठाकरे’ कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना एक भन्नाट गुगली टाकली. बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना जवळ बोलावलं. पत्रकारांनी विचारलं, "कुठे दौऱ्यावर चाललात?" यावर त्यांनी मिश्कील हसत उत्तर दिलं, "मातोश्रीवर चाललोय!" त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र काही क्षणांतच राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून पत्रकारांना लक्षात आलं की त्यांनी आपली फिरकी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT