Raj Thackeray in Latur Rally SAAM TV
Video

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची अख्ख्या महाराष्ट्राला साद; एकदा सत्ता हातात देऊन बघा!

MNS chief Raj Thackeray Speech : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लातूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. एकदा सत्ता हातात देऊन बघा, असं आवाहन त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला केलं.

Nandkumar Joshi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ लातूरमध्ये (Latur) धडाडली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. या जातीचा म्हणून याला मिळालं पाहिजे, तो त्या जातीचा म्हणून त्याला नाही मिळालं पाहिजे, ही कुठली बुद्धी. कशात पडतोय आपण, असा सवाल त्यांनी केला. मी विश्वासाने सांगतोय. फक्त तुमच्यासाठी, एकट्या मराठवाड्यासाठी सांगत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माझं सांगणं आहे, या राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा. मी विनाकारण काही बोलत नाही. मी सत्ता न पाहिलेला माणूस नाही. मी सत्ता पाहिलीय. मला खुर्चीची अभिलाषा नाही, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

महाराष्ट्रातील एकही तरूण-तरुणी ही हाताला कामाविना राहणार नाही. हे सहज शक्य आहे, असं सांगतानाच त्यांनी बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्याकडे लक्ष वेधले. माझा जाहीरनामा आता येणार आहे. ज्या गोष्टी शक्य आहेत, तेवढ्याच गोष्टी माझ्या जाहीरनाम्यात असतील, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT