Amit Thackeray addressing supporters after receiving a police notice over the Shivaji Maharaj statue unveiling in Nerul. Saam Tv
Video

अमित ठाकरेंना पोलिसांची नोटीस; शिवाजी पुतळा अनावरणाचा वाद चिघळला|VIDEO

Controversy Over Shivaji Maharaj Statue: मनसे नेते अमित ठाकरे यांना नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणादरम्यान जमाव जमवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून, यामुळे वाद अधिक चिघळला आहे.

Omkar Sonawane

मनसे नेते अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे, मात्र त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना जमाव जमवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच संदर्भात पोलिसांनी ही नोटीस बजावली होती. यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला ही खरंच चांगली गोष्ट आहे'. काही दिवसांपूर्वी, अनेक महिन्यांपासून झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अमित ठाकरे यांनी अनावरण केले होते. या वेळी परवानगीशिवाय गर्दी जमवल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला, ज्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schezwan Fried Rice: हॉटेलसारखा शेजवान फ्राइड राईस घरच्या घरी कसा बनवायचा?

बॉक्सिंग रिंगमधून उदय ते मोस्ट वॉन्टेड गुंड; 32 गंभीर गुन्हे अन्... बाबा सिद्दीकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई नेमका कोण? VIDEO

नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; शहाजी बापू पाटीलही भावुक, म्हणाले, एकटे पाडले?'

Amla Murabba Recipe : गुलाबी थंडीत 'असा' बनवा आवळ्याचा मुरंबा, आजीच्या हाताची अस्सल चव

Maharashtra Live News Update: कुर्लामधील कोहिनूर सीटी बिल्डिंगच्या ५ व्या मजल्याला आग

SCROLL FOR NEXT