MNS SaamTv
Video

MNS News : क्रिकेटचं मराठी समालोचन का नाही? मनसेचा हॉटस्टारच्या कार्यालयात राडा | Video

Amey Khopkar MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयात जाऊन मराठीच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांना धारेवर धरलेलं बघायला मिळाल.

Saam Tv

ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारच्या मुंबई येथील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज भेट दिली आहे. क्रिकेटचे प्रक्षेपण होत असताना मराठी समालोचन का होत नाही, असा सवाल यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी विचारत हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

हॉटस्टार या ओटीटी अॅपवर क्रिकेटचे मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. त्यासंदर्भात आज मनसे कार्यकर्ते आणि चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर हॉटस्टारच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी धडकले. क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण करताना समालोचनासाठी मराठीचा पर्याय देण्याची मागणी यावेळी अमेय खोपकर यांनी केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तुम्ही तिचा पर्याय का देत नाहीत? असा प्रश्न विचारात मराठीमध्ये क्रिकेट समालोचनाचा पर्याय दिला जाईल, असे लेखी लिहून द्यावे, यासाठी खोपकर आग्रही असल्याचं बघायला मिळालं. जोपर्यंत लेखी लिहून देत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याची भूमिकाही अमेय खोपकर यांनी घेतली. त्यामुळे या ठिकाणी काहीसा तणाव बघायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT