Anand Dighe News SaamTv
Video

Sanjay Shirsat : 'आनंद दिघे यांना मारलं गेलं'; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

Anand Dighe : आमदार संजय शिरसाट यांनी 'आनंद दिघे यांना मारलं गेलं आहे. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Saam Tv

आनंद दिघे यांना मारलं गेलं आहे. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघेंवर उपचार सुरू होते, ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आलं, असा सवालही शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे दिघेंचा मृत्यू का झाला, याची चौकशी करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाठ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यात प्रत्येक जण दिघे यांचा घातपात झाल्याचा आरोप करतात. दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला, असा सवाल शिरसाठ यांनी केला आहे.

तर त्यांच्या या विधानावर आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, 'निवडणुका सुरू झाल्या की असं बोललंच जात असं म्हणत, पुरावे असतील तर समोर आणा मी स्वत: कोर्टात जाईल', असं म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम

शिवसेनेच्या मेळाव्यात असं काय घडलं? 'या' वक्त्याच्या भाषणाने ठाकरेंच्या डोळ्यांत आणलं पाणी

मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार; शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT