Sunanda Pawar SaamTV
Video

Sunanda Pawar News : काका - पुतण्या एकत्र येणार? सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य, पाहा Video

Pawar Family Dispute : आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या सहकुटुंब भेटीवर भाष्य केलं.

Saam Tv

याकडे मी कौटुंबिक प्रसंगातून पाहते. शरद पवार यांना वयाची 85 वर्ष पूर्ण होत असून त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मनातील समज - गैरसमज विसरून शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा आले असतील तर त्याबाबत वेगळे काही मला वाटत नसल्याची भावना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शरद पवार यांच्याशी झालेल्या दिल्लीतील सहकुटुंब भेटीबद्दल व्यक्त केली आहे.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र हे दोन्ही गट एकत्र यावे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. मी मागील 35 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शरद पवार साहेब हे साठ वर्षे राजकारणात असून त्यांना चाणक्य म्हटले जाते, त्यांच्या मनात काय आहे हे पत्नीला देखील समजत नाही. सर्व कुटुंबात मतभेद असतात असे एकही कुटुंब राज्यात नाही की ज्यात वाद नाही. मात्र, भविष्यात वाद विसरून सर्वांनी एकत्रित यावे अशी भावना माझी आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT