MLA Hemant Rasane addressing media on his demand to make Pune’s Ganesh Festival a 24x7 open event without any restrictions. Saam Tv
Video

Pune News: पुण्यातील गणेशोत्सव २४ तास खुला ठेवण्याची मागणी; पालिका काय निर्णय घेणार? VIDEO

Pune Ganesh Festival: पुण्यातील गणेशोत्सव २४ तास खुला ठेवण्याची आमदार हेमंत रासने यांची सरकारकडे मागणी केली असून राज्य महोत्सव झालेल्या या उत्सवासाठी निर्बंध नकोत असे त्यांनी मत व्यक्त केले आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे: महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेला गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाची अधिकृत घोषणा केली असून, यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

पुणे शहरातील गणेशभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव २४ तास खुला ठेवावा आणि कोणतेही निर्बंध लागू करू नयेत, यासाठी सरकारकडे ठाम पाठपुरावा सुरू केला आहे.

आमदार रासने म्हणाले, गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा खास ओळख निर्माण करणारा उत्सव आहे. त्यामुळे तो निर्बंधमुक्त आणि भक्तांसाठी २४ तास खुला असावा, हीच आमची भूमिका आहे. राज्यभरातील गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, उत्सव अधिक भव्य आणि भाविकांच्या सहभागाने उजळून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Maharashtra Live News Update: बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर सहायक उपनिरीक्षकांनी आयुष्य संपवलं; पोलीस दलात पुन्हा खळबळ, हरियाणात नेमकं काय घडतंय?

Bigg Boss 19: अशनूर चिडली गौरव खन्नावर, फरहानाने केला अमालचा अपमान; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT