Bhaskar Jadhav  saam tv
Video

Bhaskar Jadhav: मानलेल्या लेकीची विदाई, भास्कर जाधव धायमोकलून रडले; पाहा VIDEO

Heartwarming Moment: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आपल्या घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले.

Omkar Sonawane

गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी त्यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती. पण तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा यामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले आणि आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते.

आज सुप्रियाचे लग्न होते. इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून भास्कर जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाला गेले. लग्न लागलं आणि सात फेरे झाल्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने त्यांची पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि रडू लागली तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही वेळाने स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT