pune news Saam Tv
Video

Pune News: पुण्यात अल्पवयीन टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड करुन परिसरात भीतीचे वातावरण|VIDEO

Minor Boys Vandalize Vehicles In Kondhwa: कोंढव्यात अल्पवयीन मुलांच्या किरकोळ वादातून गाड्यांची तोडफोड झाली. ३ रिक्षा व २ कारच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवली.

Omkar Sonawane

अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्याचा राग चौघा जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या कोंढव्यातील मिठानगर येथील वाहनांवर काढला. ३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून त्यांनी परिसरात दहशत माजविली. कोंढवा पोलिसांनी रात्रीतून चौघांपैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अतिक अहमद शेख (वय ४८, रा. मिठानगर, कोंढवा) या रिक्षाचालकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी घराबाहेर रिक्षा पार्क करुन ते झोपले होते. शनिवारी मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ जण दुचाकीवरुन आले. त्यांनी तोडाला मास्क लावले होते. त्यांनी आरडाओरडा करुन त्यांच्या गल्ली नंबर २ मधील त्यांच्या रिक्षाच्या काचेवर हातातील धारदार हत्यारोन मारुन काच फोडली. आवाजामुळे त्यांनी घरातून खाली येऊन पाहिले. त्यांच्या रिक्षाची काच फुटली होती. फ्रेम वाकली होती. तसेच त्याच वेळी मिर्झा समी हे कार घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांच्या मारुती कारचे दोन्ही बाजूच्या दरवाजाच्या काचावर धारदार हत्याराने मारुन त्या फोडल्या. पुढील व मागील बाजूच्या काचा फोडल्या. ते गाडीत खाली वाकल्याने त्यांना इजा झाली नाही. याशिवाय या गुंडांनी आणखी दोन रिक्षा आणि एका कारच्या काचा फोडल्याचे आढळून आले.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, मिठानगरमध्ये मध्यरात्री वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार करणार्‍या ४ पैकी तिघांना पोलिसांनी पकडले असून ते अल्पवयीन आहेत. आपआपासातील भांडणाचा राग त्यांनी दुसर्‍याच्या गल्लीत जाऊन तेथील वाहनांवर काढला आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT