Imtiaz Jalil PC SaamTv
Video

Imtiaz Jalil Press Conference : भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप; VIDEO दाखवून कारवाईची मागणी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी निवडणुकीत पैसे वाटप केलं असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार इमतियाज जलील यांनी केला आहे.

Saam Tv

संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी निवडणुकीत पैसे वाटले, असा आरोप संभाजीनगरचे एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज केला आहे. इम्तियाज जलील हे देखील संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी या बाबतचे काही व्हिडिओ देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. त्याचबरोबर महाराष्ट्र निवडणूक आयोगाला यासंबंधीचे व्हिडिओ आपण पाठवले असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेमधून दिली आहे.

व्हिडिओ दाखवत अतुल सावे यांच्यावर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले आहेत. जवाहर नगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात मुस्लिम महिलांना आणून पैसे वाटप करण्यात आले असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला. या ठिकाणी मुस्लिम महिलांना पैसे देऊन त्यांच्या बोटांना शाई लावली जात होती, असा आरोप जलील यांनी केला आहे. यात त्यांनी अॅड. अरविंद डोणगावकर यांच्यावर आरोप केले आहेत. डोणगावकर हे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाकड येथे नागरिकांचा भव्य आक्रोश मोर्चा

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Rahul Gandhi: अमित शाह यांना गृहमंत्रीपदावरून हटवा; राहुल गांधींची मागणी

Nalasopara firing : मध्यरात्रीची वेळ, अचानक रिसॉर्टमध्ये गोळीबाराचा आवाज झाला; परिसर हादरला

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

SCROLL FOR NEXT