Ladki Bahin Yojana Fraud  Saam TV
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे पैसे एका झटक्यात उडवले, खात्यात ठणठणाट; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana Fraud : लाडक्या बहिणींची पैसे परस्पर सीएसी चालकाने हडपून घेतले. नांदेड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

Satish Daud

लाडकी बहीण योजना अनेक कारणाने चर्चेत असते. अनेक ठिकाणी या योजनेत फ्रॉड केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाठा येथे घडली. लाडक्या बहिणीचे जमा झालेले पैसे त्यांच्या पतीच्या खात्यावर सीएससी केंद्र चालकाने जमा करून घेतले. रोजगार हमी योजना आणि इतर योजनेचे पैसे तुमच्या नावावर जमा झाले, असे या लाडक्या बहिणीच्या पतीला केंद्र चालकाने भासवलं.

त्यांच्याकडून आधार कार्ड आणि बँक पास बुक मागवून घेतले. पुन्हा हेच पैसे सीएससी केंद्र चालकांनी आपल्या खात्यावर जमा करून घेतले. हा सगळा प्रकार आता उघड झालाय. दरम्यान या प्रकारानंतर सीएससी केंद्र चालक गावातून पसार झाला आहे. सध्या प्रकारानंतर गावात एकच गोधळ निर्माण झालाय.

मनाठा सीएससी केंद्रा बाहेर ज्यांची फसवणूक झालीय त्यांनी मोठी गर्दी केली आहे. महसूल विभागाचे अधिकारी देखील गावात चौकशी साठी आले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून जवळपास 71 जणांना या सीएससी केंद्र चालकाने गंडा घातला आहे. तीन लाख 19 हजार 500 रुपये या केंद्र चालकाने हडप केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT