Pune bus fire saam tv
Video

Pune News: पुण्यात बसला भीषण आग, भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या|VIDEO

Volvo bus fire: पुणे-बेंगळुरू हायवेवर व्होल्व्हो बसला भीषण आग लागली आहे, ही आग इतकी भीषण होती प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला.

Omkar Sonawane

पुणे-बेंगळुरू महामार्गावर खेड शिवापूरजवळ ससेवाडी गावाच्या हद्दीत आज दुपारी सुमारे १२.३० वाजता एका प्रवासी व्होल्व्हो बसला भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून, सुदैवाने बसमधील सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले आहेत.आग लागल्यानंतर बसमध्ये धुराचे लोट पसरले आणि भीतीमुळे प्रवाशांनी तात्काळ बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही बस पुण्याहून बंगळुरूच्या दिशेने जात होती. दुर्घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यासाठी मार्गस्थ आहे. बसमधून धुराचे आणि आगीचे मोठे लोळ परिसरात उठताना दिसत असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तरुणीचा भाओजीवर जीव जडला, लग्नाच्या ३ दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं; सियानंतर उर्मिलाचं हादरवणारं कृत्य

Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनचा थरार! मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू; प्रसिद्ध व्यापाऱ्याला अटक

वाढीव वीजबिलांवर मनसे आक्रमक! २ हजार तक्रारींसह महावितरणला इशारा

गावरान पद्धतीची पाथरीची भाजी, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra News Live Update: कोरेगाव भीमा आठवडा बाजारात पुन्हा चोरट्यांचा डाव फसला; दोन सराईत अटक

SCROLL FOR NEXT