Kalyan- Shilphata Road Traffic Saam Tv
Video

Kalyan- Shilphata Road: कल्याण- शीळ रोडवर मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांसह विद्यार्थ्यांना फटका, शाळांना सुट्टी

Kalyan- Shilphata Road Traffic: कल्याण-शीळफाटा रोडवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. आज या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Priya More

कल्याण- शीळ रोडवरील वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांसह शाळकरी मुलांना बसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शासकीय यंत्रणांच्या समन्वयाआभावी कल्याण- शीळ रोडवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका आता सर्वांना बसताना दिसत आहे.

कल्याण - शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. कल्याण- शीळ रोडच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातच याच रस्त्यावर आता मेट्रोचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएसईबी आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय नसल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

आज सकाळी मेट्रोने बॅरिगेटिंग केल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. या वाहतूके कोंडीचा फटका आजूबाजूच्या शाळांना देखील बसलाय. या परिसरातील विद्यानिकेतन शाळेने दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीतल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT