container ship catches fire near Kerala coast : अरबी समुद्रात जहाजाला लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात आलं नाही. या जहाजावरील १८ जणांची भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून सुटका करण्यात आली. तर या जहाजावर कंटेनरमध्ये काही धोकादायक पदार्थ असून त्यामध्ये स्फोटक पदार्थांचा समावेश असल्याचं बंदराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांक़डून सांगण्यात आलं. अद्यापही जहाजाला लागलेली आग धूमसते आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रिपोर्टनुसार, केरळजवळ समुद्रात कंटेनर जहाजावर लागलेली आग नियंत्रणात आलेली आहे, असं सांगितलं जात आहे. पण धुराचे लोट बघता ही आग धुमसतीच आहे, असं दिसून येत आहे. हे जहाज एका बाजूला झुकायला लागलं आहे, तसंच जहाजावरील काही कंटेनर हे समुद्रात पडल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आलं. केरळजवळ समुद्रात जहाजावरील काही कंटेनर वाहून गेल्यामुळं इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओसियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसनं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.