Marathwada Latur Rain Updates  Saam TV
Video

Latur Rain News : लातूर जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस; रस्त्यांवर कमरेइतकं पाणी, पाहा VIDEO

Satish Daud

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. २४) मुसळधार पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मुरुड, औसा, लातूर शहर, रेनापुर यासह इतर भागात देखील पावसाने झोडपून काढलंय. शहरातील जलसिंचन भवन कार्यालयात पाणी शिरल्याने संपूर्ण कार्यालयात पाणी तुंबलं आहे.

दरम्यान पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि जुनी रेकॉर्ड भिजली आहेत. रेनापुर तालुक्यातील खलंग्री भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. मुरुड शहरातल्या दत्तनगर भागात धडकी भरवणारा पाऊस झाला असून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे.

त्यामुळे संसार उपयोगी वस्तू केल्या वाहून आहेत. मध्यरात्री प्रशासन आणि ग्रामस्थांनी बचाव कार्य करत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. अनेक नागरिकांनी मंदिराचा आसरा घेतला आहे. दुसरीकडे औसा तालुक्यातील औसावाडी ते उटी बुद्रुक जाणाऱ्या रस्त्यावरील ओढायला पूर आल्याने एक दुचाकी स्वार वाहून गेला आहे. मात्र सुदैवाने हा युवक सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का? बडे नेते तुतारी फुंकणार? VIDEO

Weather Update: चक्रीवादळाचा कहर! मुंबईनंतर 'या' राज्यांमध्ये करणार विध्वंस, पाहा IMD चा नवी अपडेट

Pankaja Munde: 'जागा नसल्यानेच मी विधानपरिषदेवर', पंकजा मुंडेंना महायुतीत 'जागा' नाही?

Afghani Onion Import : अफगाणिस्तानाच्या कांद्याची भारतात एन्ट्री; केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, VIDEO

Shukra Gochar: शुक्राचे धनू राशीत संक्रमण, 'या' तीन राशींचे बदलणार भाग्य, होईल भरभराट

SCROLL FOR NEXT