Devendra Fadnavis on marathi mandatory for auto and Taxi drivers saam tv
Video

Marathi Language : रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर CM फडणवीसांचं मोठं विधान

Auto Driver marathi : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी येणं बंधनकारक केल्याच्या निर्णयावरून काही संघटनांनी संपाची हाक दिल्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य असल्याच्या निर्णयानंतर काही संघटनांनी संपाची हाक दिली आहे. यावरून राजकारण तापलं असून, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठीचा आग्रह योग्य आहे; पण वाद नको, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मराठी बोलता येत नसलेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी शिकवणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो, येथे मराठीचा आग्रह असणे किंवा मराठी भाषेला प्राथमिकता द्यायला हवी यात काही चुकीचं नाही. जे आमच्याकडील रिक्षा-टॅक्सीचालक आहेत, यातील ज्यांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवणार. देशात सक्ती वैगेरे करून भाषेच्या नावावर हिंसा करणे स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आम्ही रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकवू. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT