Mumbai News SaamTv
Video

Marathi Language : मुंबईत मराठीची पुन्हा गळचेपी; मराठी मुलं नको, म्हणत कामावर ठेवण्यास दिला नकार, पाहा Video

Mumbai News : मराठी भाषेचा वाद सध्या राज्यात बघायला मिळत आहे. मराठी माणूस आणि भाषेचा अपमान केल्याच्या घटना वाढल्या असून अशीच एक घटना पुन्हा मुंबईत घडली आहे. ठाकरे गटाने यावर आक्रमात पवित्रा घेतली आहे.

Saam Tv

मुंबईत पुन्हा एकदा मराठीची गळचेपी झाल्याचं समोर आलं आहे. नोकरीसाठी गेलेल्या एक तरूणावर कंपनीने अन्याय केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईत राधेशाम ब्रदर्स कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावर घेण्यास कंपनीने नकार दिला आहे.

राज्यातल्या अनेक भागात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा सध्या अपमान होताना बघायला मिळत आहे. पुणे, मुंब्रामधील मराठी-आमराठीचे वाद ताजे असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा मराठीची गळचेपी झालेली बघायला मिळाली आहे. राधेशाम ब्रदर्स या मुंबईतील कंपनीमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कंपनीने मराठी माणूस नको म्हणून काम देण्यास नकार दिला आहे. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नकोय, असं संतापजनक वक्तव्य कंपनी मालकाने केलं आहे. तसंच मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असंही कंपनी मालकाने म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संतोष शिंदे यांनी कंपनी मालकाला जाब विचारला आहे. आता या सगळ्या प्रकारावर मनसे काय भूमिका घेणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT