Local tension rises in Ghatkopar as viral video shows woman refusing to speak Marathi and forcing Hindi on locals. Saam Tv
Video

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Ghatkopar Marathi Hindi Clash: मुंबईतील घाटकोपरमध्ये एका उत्तरभारतीय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

घाटकोपर पूर्वेकडील परिसरात पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेचा वाद पेटला आहे. एका उत्तरभारतीय महिलेने मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आणि मराठी भाषिक नागरिकांना हिंदीत बोलण्यास दमदाटी करताना दिसली. संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, सोशल मीडियावर तो आता व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच मिरा-भाईंदर परिसरातील एका व्यापाऱ्याने मराठी भाषेला विरोध करत हिंदीचा आग्रह धरला होता. त्या प्रकरणी मनसेने तात्काळ कारवाई करत व्यापाऱ्याला जाब विचारला होता. आता घाटकोपरमधील नव्या प्रकरणामुळे मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या आधीही घाटकोपर परिसरात मराठी आणि गुजराती भाषिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT