Maratha Morcha At matoshree Saam TV
Video

VIDEO : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी मातोश्रीवर धडकले; उद्धव ठाकरेंना दिला शेवटचा इशारा

Maratha Morcha At matoshree : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कलानगरमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय.

Satish Daud

उद्धव ठाकरे यांनी तातडीने मराठा आरक्षणावर आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्ही मातोश्री निवास्थानाबाहेर बसून मोठं आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी मराठा पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली. यावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे.

मराठा समाजाकडे केला तरी ते आपल्यालाच मतदान करतात, असा यांना भ्रम झाला आहे. पण भ्रमात राहू नका तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ, असा इशारा मराठा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सध्या मोठ्या संख्येने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी कलानगरमध्ये दाखल झाले आहेत.

पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मराठा पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत उद्धव ठाकरे आम्हाला भेटून आमचं निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नाही, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकारी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT