Maratha Aandolak Saam Tv
Video

Maratha Reservation: आरक्षण दिलं तर तुमच्यासोबत, नाही तर...; मराठा आंदोलकांचा अशोक चव्हाण यांना इशारा, VIDEO

Maratha Aandolak questioned To Ashok Chavan : मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण यांना जाब विचारला. आरक्षण दिलं तर तुमच्यासोबत अन्यथा विरोधात अशी भूमिका घेतल्याचं मराठा आंदोलकांनी सांगितलं आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : भाजप खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघातील मुगट या गावी एका कार्यक्रमात मराठा आंदोलकानी जाब विचारला. आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो? आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवा, अशी विनंती मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण केलीय.

आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्यासोबत, नाही तर तुमच्या विरोधात असे खडे बोल आंदोलकांनी चव्हाण यांना सुनावले आहेत. तुम्ही आरक्षणासाठी काय केलं? याचं उत्तर देखील आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना विचारलं. काल रात्री मुगट या गावात कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते. यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात सातत्याने मराठा आंदोलकांकडून चव्हाण कुटुंबीयांना विरोध होतोय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT