Manoj Jarange News SaamTV
Video

Jalna News : अंतरावली सराटीत इच्छुक उमेदवारांची गर्दी; मनोज जरांगे विधानसभेबाबत करणार चर्चा

Maratha Reservation Issue : आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणावर निर्णय घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी महायुतील केली होती. मात्र यावर कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याने आता मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

Saam Tv

विधानसभेत उमेदवार उभे करायचे की पाडापाडी करायची याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या 20 ऑक्टोबरला कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहेत. मात्र त्या आधी आज इच्छुक उमेदवारांकडून त्यांनी विधानसभेसाठी अर्ज मागवले असून त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. आज अंतरावली सराटीत मनोज जरांगे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी चर्चा करणार आहेत. तर 20 ऑक्टोबरला निवडणूक लढवायची की पाडापाडीचं राजकारण करायचं यावर भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यापूर्वी इच्छुकांना कागदपत्र तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. अंतरावली सराटीत राज्यभरातून इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. सरपंच पांडुरंग तारक यांच्या मळ्यात मनोज जरांगे हे इच्छुकांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

Shocking News : दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेतच आयुष्य संपवलं, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Mumbai To Amravati: मुंबईहून अमरावतीपर्यंत प्रवास करायचा आहे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग आणि महत्त्वाचे टिप्स

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

Rule Change: LPG गॅस, UPI ते क्रेडिट कार्ड...; १ ऑगस्टपासून ६ नियमांत होणार मोठे बदल

SCROLL FOR NEXT