Maratha community celebrates in Mumbai after government assurance on Hyderabad Gazette implementation. Saam Tv
Video

Maratha Protest: मराठा बांधवांचा जल्लोष; पाटील बोलते सबको को** | VIDEO

Maratha Protest Victory: मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाले असून सरकारने एका तासात हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे मुंबईत मराठा बांधवांचा जल्लोष सुरू आहे.

Omkar Sonawane

सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले

मराठा आंदोलन चार दिवसांपासून मुंबईत सुरू होते

हायकोर्टाने राज्य सरकार आणि आंदोलकांना सुनावले

सरकारने सर्व गुन्हे मागे घेण्याचा दिलासा दिला

मराठा आंदोलनाच्या लढ्याला अखेर आज यश आले असून हैद्राबाद गॅझेट सरकार एका तासात लागू करेल असे आश्वासन मराठा उपसमितीने दिले. गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये मनोज जरांगे हे आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हा मुंबईमध्ये एकवटला होता. यावरून हायकोर्टाने राज्यसरकार आणि आंदोलकांना देखील सुनावले होते. आंदोलन सुरू झाल्यापासून सरकारने धास्ती घेत हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर आज मागण्या मान्य करत सातारा गॅझेटीयरला एक महिना वेळ मागितला आणि मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचे देखील सरकारने सांगितले. तसेच एका तासाभरात जीआर काढणार असल्यामुळे मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचा मोठा जल्लोष सुरू झाला आहे. मराठा बोलते सबको को**अशा घोषणा दिल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीचे आई-वडील मूक मोर्चात सहभागी

Aam Papad Recipe : बाजारात मिळतो तसा 'आम पापड' घरीच बनवा, मुलांसाठी आंबट-गोड चवीचा खाऊ १० मिनिटांत तयार

Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

FD Calculation: महिन्याला ₹१०,००० हजाराचं व्याज हवयं? वाचा एफडीचं कॅलक्युलेशन

Summer Wedding Fashion: उन्हाळ्यातील लग्नसराईसाठी काय घालायचा? जड लेहेंगा सोडा, ट्राय करा हे कम्फर्टेबल ड्रेस

SCROLL FOR NEXT