Solapur Dhule Highway SaamTv
Video

Maratha Reservation : सोलापूर-धुळे महामार्गावर रास्तारोको

Solapur-Dhule Highway : वडीगोद्रीमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. सोलापूर धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांकडून रास्तारोको करण्यात येत आहे.

Saam Tv

वडीगोद्रीमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. सोलापूर धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांकडून रास्तारोको करण्यात येत आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलक पुन्हा आमनेसामने आल्यानं हा तणाव वाढला आहे. याठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येऊन घोषणाबाजी करत आहेत. याठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त असतानाही मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने येत आहे. अंतरवाली सराटीच्या रस्त्यालाच लक्ष्मण हाके यांच आमरण उपोषण स्थळ असल्याने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत येत आहे त्यामुळं गोंधळ होत आहे. त्यातच आता मराठा आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्गावर रास्तारोको सुरू केला आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला होता. मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी निघालेल्या मराठा बांधवांची वाहने पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवली. त्या ठिकाणी काही ओबीसी बांधव देखील होते. यावेळी मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक यांनी ओबीसी आंदोलक एकमेकांसमोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT