Maratha Reservation Saam Tv
Video

Maratha Kranti Morcha: आमचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, केरे पाटील नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

Kere Patil Supports Manoj Jarange Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे. केरे पाटील यांनी देखील ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलंय. यावेळी रमेश केरे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी केलीय. आतापर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी झालाय. मनोज जरांगे यांना वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात देखील ज्या-ज्या वेळेस आंदोलन केलं जाईल, तेव्हा मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्यासोबत असेल असं रमेश केरे यांनी जरांगे पाटलांना सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या आंदोलनाच्या मागे शरद पवार आहेत. मातोश्रीवर आंदोलन करायला गेल्यास ते म्हणतात आमच्या पाठीमागे भाजप आहे. सगळ्या पक्षांनी एकत्रित या आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे यांनी केली आहे. जरांगे पाटलांना प्रत्येक आंदोलनात आमचा पाठिंबा असेल, असं केरे पाटील यांनी सांगितलं आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईत देखील वातावरण तापत असल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT