Tense moments from the Maratha community meeting at Solapur’s Government Rest House after a verbal dispute turned into physical assault. Saam Tv
Video

Solapur Clash: मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? VIDEO

Internal Clashes During Maratha Reservation Movement Discussions:सोलापूरमधील मराठा समाजाच्या बैठकीत वादग्रस्त वक्तव्यामुळे गोंधळ उडाला. रोहित फावडे यांच्यावर जन्मजेयराजे भोसले समर्थकांनी हल्ला केल्याने बैठक तणावात गेली.

Omkar Sonawane

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर पुढील भूमिका ठरवण्यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी जमले होते. या बैठकीस अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकांसह उपस्थित होते. बैठकीदरम्यान पंढरपूरहून आलेल्या ऍड. रोहित फावडे यांनी मनोगत व्यक्त करताना जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात "अमोलराजे भोसले काय म्हणाले?" असा सवाल उपस्थित केला.

यामुळे उपस्थित भोसले बंधूंचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी रोहित फावडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बैठकीत अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. समन्वयकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रकरण हाताबाहेर गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मधुमेहाच्या रूग्णांनी 'ही' फळं खावीत; शुगर वाढण्याची समस्या येणार नाही

Zodiac Stones: राशीनुसार कोणते रत्न परिधान केले पाहिजे, जाणून घ्या

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

SCROLL FOR NEXT