Laxman hake on Manoj Jarnge Saam TV
Video

Laxman Hake: मराठा सामाजिक मागास असा अहवाल कुणी दिला?, लक्ष्मण हाके यांचा सरकारला सवाल

Laxman hake on Manoj Jarnge: मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली. याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे.

Priya More

ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी कुणबी दाखल्यांचं काय असा सवाल विचारला आहे. तर मराठा सामाजिक मागास असल्याचा अहवाल कुणी दिला...? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उपस्थित करत सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या जशाच्या तशा योजना लागू करत आहे. मराठा समाजाला कुणी सामाजिक मागासलेले ठरवलं अस. असं काही अहवाल कोणी दिला आहे का असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला विचारला आहे. ओबीसी समाजासाठी आणि मराठा समाजासाठी राज्य सरकारने किती कोटी रुपये खर्च केले आहेत याची शासनाने श्वेत पत्रिका काढायला हवी अशी मागणी देखील लक्ष्मण यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Combination : वांगी आणि दही एकत्र खाताय? आरोग्याला होणारे 5 मोठे नुकसान जाणून घ्या

Flat Stomach Yoga: पोटाची चरबी कमी करून, सपाट पोट हवंय? तेही झटपट; मग, 'ही' 7 योगासनं ट्राय करा

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

Accident : वडाळ्यात भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT