Maratha Aarakshan Saam Tv
Video

Maratha Aarakshan: मराठा आंदोलकांची रात्र कशी गेली? पाहा VIDEO

Maratha Aarakshan Video: मराठा आरक्षणासाठी हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. काल रात्रभर ते मुंबईत राहिले. यावेळी त्यांचे प्रचंड हाल झाले. खाण्यापिण्यासाठी आणि झोपण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नव्हत्या.

Siddhi Hande

कालपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. काल दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेतला. मात्र, मराठा आंदोलकांचे रात्री प्रचंड हाल झाले. काल सीएसएमटी भागातील सर्व दुकाने बंद असल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. याचसोबत त्यांना झोपण्यासाठी सोय नव्हती. अनेक मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकात, भुयारी मार्गात, रेल्वे स्टेशनवर झोपलेले पाहायला मिळाले. अनेकांनी बीएमएसी कार्यालयासमोर अंथरुण करुन झोपले. तर अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी पुलाच्या खाली झोपण्यासाठी आश्रय घेतला. काल मराठा आंदोलकांना खाण्यापासून ते रात्री झोपण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. चेंबुरमध्येही अनेक मराठा आंदोलकांनी आश्रय घेतला. रात्री रस्त्यावर ब्रिजखाली त्यांनी जेवण केले आणि तिथेच झोपले. याचसोबत अनेक मराठा आंदोलक ट्रक, टेम्पोमध्ये झोपल्याचेही पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT