Local Train Harbor Line News Saam TV
Video

Mumbai Local Train : हार्बर मार्गावरील अनेक लोकल खोळंबल्या, प्रवाशांची मोठी धावपळ; वाशी स्टेशनजवळ काय घडलं?

Local Train Harbor Line News : वाशी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत.

Satish Daud

तुम्ही जर हार्बर रेल्वेमार्गाने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वाशी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा खोळंबा झालाय. पनवेल येथून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत.

तर काही लोकल उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्थीचे काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलच्या वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय.

पनवेल येथून सीएसएमटी आणि सीएसएमटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. भल्यापहाटे कामावर निघालेल्या व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT