Sanjay Shirsat Residence Attack 
Video

मध्यरात्री भयंकर घडलं! महायुतीच्या मंत्र्याच्या घरावर हल्ला; दगड अन् काचेच्या बाटल्या फेकल्या, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Sanjay Shirsat Residence Attack : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडीतील निवासस्थानाजवळ मध्यरात्री दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली. संशयितांना पकडण्याच्या प्रयत्नात दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

Namdeo Kumbhar

सामाजिक न्याय मंत्री, तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगरमधील गोलवाडी परिसरातील निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री तीन तरुणांनी दगड आणि काचेच्या बाटल्या भिरकावून फेकल्या आणि गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत संशयितांना पकडण्याच्या प्रयत्नात दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. शिरसाट यांच्या घरावर हल्ला केलेली घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीवर ३ तरूण आल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्यांनी नेमका हल्ला का केला? याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मात्र, या हल्ल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "पोलीस आयुक्तांचा फोन बंद असून एकही डीसीपी (DCP) किंवा एसीपी (ACP) घटनास्थळी पोहोचला नाही. पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होतोय, त्याची तरी दखल घ्या," अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले. यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी फोन उचलून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या मेडिकल चौकात कुख्यात गुंड पलाश वासनिकची निर्घृण हत्या

Waxing or Shaving: महिलांनी हाता-पायांवरील केस काढण्यासाठी शेव्हिंग करावे की वॅक्सिंग?

Karjat Fort : थंडीत ट्रेकिंगची मजा घ्यायचीय? कर्जतजवळचे 'हे' ७ सुंदर किल्ले तुमच्यासाठी बेस्ट

NCP Merger: राज्याच्या राजकारणात खळबळ!'त्या' विधानानंतर सुनेत्रा पवारांकडून आमदारांना थेट कॉल; विलीनीकरणाबाबत काय ठरलं?

Transfer : पोलीस दलात मोठे फेरबदल! ३ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे केली नियुक्ती ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT