MANOJ JARANGE PATIL LIFE THREAT CLAIM saam tv
Video

मनोज जरांगेंच्या जीवाला कुणापासून धोका? 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर खळबळजनक आरोप|VIDEO

Manoj Jarange Patil Exclusive Interview With Saam TV: मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. आपल्याला बदनाम करून संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत त्यांनी जीवाच्या धोक्याबाबत काय म्हटलं? पाहा VIDEO

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून जरांगे यांचे आंदोलन दडपण्यासाठी ५०० कोटी रुपये घेतल्याचा संवाद या क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. याच मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी 'साम टीव्ही'च्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या कार्यक्रमात मुलाखत देत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

साम टीव्हीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी, "तुम्हाला कोणापासून जीवाला धोका आहे का?" असा प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, "त्यांना मला बदनाम करायचे होते आणि संपवायचे होते. मी गरिबांच्या बाजूने उभा राहतो, म्हणून मी गरिबांच्या बाजूने राहू नये असा त्यांचा प्रयत्न होता. गरिबांच्या वाट्याला का जाता? मी कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार आहे, मी कोणालाही भीत नाही. माझ्या घरावर हल्ला करायचा असेल तर करा. आता खरं दाबायचे आहे म्हणून हे लोक रस्त्यावरही हल्ला करू शकतात. पण जर हल्ला करायचा असेल, तर मागून येऊ नका, समोरून या... मग दाखवतो मी कसा आहे," असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान

Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Menopause Symptoms: महिलांच्या शरीरात वयाच्या ३० वर्षांनंतर होतात हे मोठे बदल; काय आहे कारण मेनोपॉज की दुसरं काही?

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT