Manoj Jarange Patil Saam tv
Video

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीत मराठा समाज कोणाच्या पाठिशी असणार? ऐन निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange Patil News : विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे.

Saam Tv

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यादरम्यान, निवडणुकीत मराठा समाजाने कोणाला मतदान कायला पाहिजे, याविषयी मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही. तर यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा बांधवांना आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही, त्यांना खडेबोल सुनावत त्यांनीच पचका करून ठेवला आहे. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. आता अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नये, त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही, असे मनोज जरांगे पुढे म्हणाले.

'मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते, मात्र त्यांच्यासाठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे करू शकत नाही, मी मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचं काम करतो, दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी कोटी मराठ्यांना अडचणीत आणणार नाहीत. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते, टोमणे मिळाले असते. त्यामुळे माझी समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली, असे मनोज जरांगे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT