Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

Manoj Jarange Patil, Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीचा स्पष्ट कालावधी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा त्यांचा निर्धार आहे.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसणार आहेत. आज सकाळी १० वाजता उन्हात खाट (बाज) टाकून जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल. काल रात्री राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत विखे पाटील आणि लाड यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जोपर्यंत मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही आणि त्याची अंमलबजावणी किती दिवसांत होणार हे स्पष्ट केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. सरकारचे शिष्टमंडळ रिकाम्या हाताने परतल्यामुळे आता जरांगे आज सकाळी १० वाजल्यापासून उन्हात बसून आंदोलन करणार आहेत. यावर सरकार आता काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

SCROLL FOR NEXT