Chhagan Bhujbal  saam tv
Video

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांविरोधात अजित पवारांची नवी खेळी?

Ajit Pawar News : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते. आता अजित पवार यांनी भुजबळांच्या विरोधात नवा डाव टाकलाय. माणिकराव कोकाटे यांना बळ देण्याचं काम केलेय.

Namdeo Kumbhar

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. भुजबळांची नाराजी दूर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. पण आता छगन भुजबळ यांच्याविरोधात अजित पवार यांनी नवी खेळी केल्याची जोरदार चर्चा होत आहे. अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना बळ दिलेय.

छगन भुजबळ यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना बळ दिलेय. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे अजित पवार यांनी कृषी मंत्रालयाची धुरा सोपवली आहे. कृषी मंत्रालय मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी टाकलेल्या या डावाची राजकीय चर्चा होत आहे.

माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांचं राजकीय वैर नाशिककरांना चांगलेच माहित आहे. भुजबळ यांना उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. मंत्री झाल्यानंतर कोकाटे यांचा पहिला दौरा येवला असेल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमधील वादाची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT