Raj thackeray  X
Video

Maharashtra Politics: मंगल प्रभात लोढांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दादर कबुतरखान्याबाबत चर्चा

Raj thackeray And Mangal Prabhat Lodha: मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मंगळवारी शिवतीर्थ येथे ही भेट झाली. या भेटीदरम्यान दादर कबुतरखान्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली.

Priya More

दादरमधील कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थांनी मंगळवारी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दादर येथील कबुतरखान्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काही तरी सकारात्मक चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, दादर येथील कबुतरखाना मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महानगर पालिकेकडून बंद करण्यात आला होता. कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाकडून विरोध करण्यात आला होता. यासाठी दादरमध्ये आंदोलन देखील करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या उदगीर- बिदर रोडवर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

कृषी विभागाचा महाघोटाळा? कृषी कंपन्यांच्या नावावर अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पहिल्यांदाच SIT चौकशी, IPS सातपुतेंनी ६ तासांत काय-काय विचारलं?

Vasai: लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT