Pune Accident News 
Video

Pune Accident : पुण्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा! जखमी मित्राला सोडून जीवलग मित्र पळाला, उपचार न मिळाल्याने मृत्यू

Pune Accident News : दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है... याची प्रचिती पुण्यात आली. जखमी मित्राला सोडून त्याने पळ काढला. उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Pune accident case where friend abandons injured companion : दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है... याची प्रचिती पुण्यात आली. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणाचे काम जिवलग मित्रानेच केलेय. अपघातात जखमी झालेल्या मित्राला सोडून मित्राने पळ काढला. उपचार न मिळाल्याने जखमी मित्राचा मृत्यू झालाय. बिबेवाडीमध्ये अपघात झाला, त्यामध्ये कृष्णा ससाने याला अपघात गंभीर जखम झाली. त्याच्यासोबत असणाऱ्या संतोष भिसे याने मदत करण्याऐवजी पळ काढला. उपचार न मिळाल्याने कृष्णाचा मृत्यू झाला. पुण्यात या घटनेची चर्चा होत आहे.

संतोष भिसे आणि कृष्णा ससाने हे जिवलग मित्र होते. मात्र यातील कृष्णा ससाने याचा मृत्यू झाला तोही मित्र संतोष भिसे याच्यामुळे. झालं असं की दोन दिवसापूर्वी मित्र बँड वाजवण्याचे काम उरकून घरी निघाले होते. दरम्यान बिबेवाडी रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेला कृष्णा ससाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला पोलीस स्टेशन जवळील मैदानातील गाड्यांमध्ये सोडून संतोष भिसे हा मित्र पसार झाला.

परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने जखमी कृष्णाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे दिसून आले. मैदानात आढळलेला मृतदेह अपघातग्रस्त कृष्णा याचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. बिबवेवाडी पोलिसांनी संतोष भिसेवर भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक ही केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT