Chhagan Bhujbal Saam tv
Video

Chhagan Bhujbal : मालेगावात लागले बनर्स, भुजबळ भाजपच्या वाटेवर? Video

Malegaon Political News : मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करतील का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

Saam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने मालेगावमध्ये भुजबळ यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरमुळे राजकीय चर्चाना उधाण आलेलं आहे. भुजबळ समर्थकांनी लावलेल्या अमित शाह आणि छगन भुजबळांच्या स्वागताच्या बनर्सवरून घड्याळाचे चिन्ह गायब असल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमित शाह आज मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ देखील आज अमित शाह यांच्या मालेगाव दौऱ्यात सहभागी झाले आहेत. अमित शाह यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात लागलेल्या अमित शाह आणि छगन भुजबळांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहे. हे बॅनर्स आता चर्चेचा विषय ठरत आहे. भुजबळ समर्थकांनी हे अमित शाह आणि छगन भुजबळांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहे. या बॅनर्सवर राष्ट्रवादीचं नाव आणि पक्ष चिन्हं गायब आहे. बॅनर्सवर फक्त अमित शाह आणि छगन भुजबळ यांचा फोटो आहे. त्यामुळे भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का? राष्ट्रवादीला रामराम ठोकून भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT