Devendra Fadanvis News SaamTv
Video

Bhiwandi : भिवंडीत गेम पलटणार? भाजपला मोठा धक्का; 10 नगरसेवक काँग्रेससोबत जाणार?

Bhiwandi municipal politics latest news : भिवंडी महानगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. १० नगरसेवक भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा; महापौर निवडणुकीआधी राजकीय समीकरणे बदलणार?

Namdeo Kumbhar

Bhiwandi Municipal Corporation news : भिवंडी महानगरपालिकेतत भाजपला मोठा धक्का बसला आहे. महापौर निवडणुकीच्या आधीच पक्षाला खिंडार पडलंय. भाजपच्या 22 पैकी 10 नगरसेवकांनी बंडाचं निशाण फडकवत काँग्रेसची वाट धरलीय. सूत्रांनी ही माहिती दिलीय. १० नगरसेवकांचा हा गट थोड्याच वेळात मुंबईतील 'टिळक भवन' इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणारे आहे. या भेटीनंतर अधिकृत पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या भिवंडीत आता काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपसाठी मोठा राजकीय हादरा मानला जातोय.

महापौर-उपमहापौर कोण होणार ?

भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या धक्कादायक घडामोडी घडत आहेत. कोणत्याच पक्षाला बहुमत नसताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाने स्थापन केलेल्या 'सेक्युलर फ्रंट'मध्ये भाजपचे बंडखोर नारायण चौधरी सहभागी होत असल्याचे बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर, काँग्रेस पक्षाने आपले महापौरपदाचे उमेदवार म्हणून नारायण चौधरी यांचे नाव जाहीर केले आहे.

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी भिवंडी पालिकेत महापौरपदासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नारायण चौधरी, तर उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून तारीक मोमीन यांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच, त्यांच्या नावे सर्व नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, भाजपमधील एक नाराज गट सुमित पाटील व नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेला आहे. या भेटीनंतर गुरुवारी दिवसभरात कोणत्या नवीन राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

TCS Case Nida Khan : धर्मांतरण, महिलांच्या लैंगिक शोषणातील आरोपी निदा खानला कोठडी

Pune: प्रेमसंबंधातून १६ व्या वर्षी लग्न, दोन वर्षांनी तरुणीचा मृत्यू; जेवणातून विष देऊन मारल्याचा आई-वडिलांचा आरोप

Bhindi Rice Recipe: रात्रीच्या जेवणासाठी करा 'भेंडी राईस', लहानमुलेही चाटून पुसून खातील, ही आहे भन्नाट रेसिपी

PM मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT