Onion News Update Saam Tv
Video

Onion News : निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांद्याचा वांदा कायम

Issue In Onion exportation : सिस्टीम अपडेट नसल्यामुळे कस्टमचे कागदपत्र तयार करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत लाखो टन कांदा बॉर्डरवर अडकून पडलेला आहे.

Saam Tv

किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल होत आहे. सद्यस्थितीत लाखो टन कांदा अडकून पडलेला आहे. यात बंगलादेशाच्या बॉर्डरवर 100 ट्रक अडकले आहेत. तर मुंबईच्या पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडलेले असल्याची माहिती समोर आली आहे. सिस्टीम अपडेट नसल्यामुळे कस्टमचे कागदपत्र तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचं प्रचंड नुकसान होत आहे. यात लाखो टन कांदा सडण्याची भिती व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

सिस्टिम अपडेट झालेली नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून कांदा ट्रकमध्येच पडून आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केलं आहे आणि निर्यात शुल्कावर 20 टक्के कपात केली होती. मात्र आता यानंतर कस्टमचे कागदपत्र तयार करण्यासाठी सिस्टिम अपडेट झालेली नसल्याने बॉर्डरवर लाखो टन कांदा अडकून पडलेला आहे. बंगलादेशाच्या बॉर्डरवर 100 ट्रक यामुळे अडकले आहेत. यात कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे मोठे नुसकान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT