Udayanraje Bhosale withdraws nomination from Satara District Bank election saam tv
Video

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून, उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Bharat Jadhav

  • उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.

  • भाजपला पाच आणि शिवसेना-राष्ट्रवादीला मिळून पाच जागा मिळण्याची शक्यता.

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमुळे निवडणुकीतील घडामोडींना वेग.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँक निवडणकीतून उमेदवारी अर्ज मागं घेतलाय. आरबीआयच्या सहकारी बँकांच्या 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या संचालकांच्या संदर्भातील एका नियमामुळं अडचण निर्माण होऊ नये या कारणामुळं उदयनराजे भोसलेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही अखेरच्या दिवशीच ठरलाय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपला ५ तर शिवसेना-राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत्यांच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत. भाजपची स्वतंत्र बैठक सुरू आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र बैठक होतेय. आज अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने जिल्ह्याचे लक्ष अर्ज कोण माघारी घेणार याकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhai Dooj Horoscope: भाऊबीजेचा सण ठरणार 'या' राशींसाठी खास; कुटुंबाचा पाठिंबा, तर काहींना मिळणार यशाची संधी

Maharashtra News Live Update: अमोल कोल्हे आणि जयंत पाटील पवारांच्या भेटीला, आज पुन्हा सिल्वर ओकवर खलबतं

Cancer Screening: वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने 'ही' महत्त्वाची टेस्ट केलीच पाहिजे; अन्यथा...

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

SCROLL FOR NEXT