Nitesh Rane saam tv
Video

Maharashtra Politics: महायुतीत वादाची ठिणगी, नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यात जुंपली|VIDEO

Political dispute between Nitesh Rane and Yogesh Kadam: गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफ आय आर मध्ये जरी नाव आले नसेल. वाचवणारे कोणी असेल तर आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत.

Omkar Sonawane

महायुतीचे दोन मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांनी योगेश कदम यांच्या मतदारसंघात जाऊन नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. काही चिंता करू नका आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे.

गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफ आय आर मध्ये जरी नाव आले नसेल. वाचवणारे कोणी असेल तर आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधित खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावं असे नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर देत नितेश राणे यांच्यावर घनाघाती टीका केली. नितेश राणे माझे मित्र आहे. पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगलं समजतं असे चोख प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी नितेश यांना यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT