Mahayuti Cabinet india Today
Video

Mahayuti Cabinet Expansion: शिंदे गटाच्या मंत्र्यांना डच्चू? मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तयार

Mahayuti Cabinet: महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे... मात्र हा विस्तार मागील सरकारमधील मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकावरून ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची आहे. त्यातच शिंदे गटात मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच सुरु आहे. तर शिंदे गटाला महायुतीत 13-14 मंत्रिपदं मिळणार आहेत. त्यापैकी 10 ते 12 मंत्र्यांना या आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे..त्यापार्श्वभुमीवर हायकमांडने शिंदे गटाच्या इच्छुक मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक मागवलं होतं. त्यात मागील सरकारमधील अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन मंत्री नापास तर संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईकांसह 5 नेते पास झाल्याची माहिती शिंदे गटातील वरिष्ठ सुत्रांनी दिलीय.. त्यामुळे शिंदे गटाचे संभाव्य मंत्री कोण आहेत? पाहूयात

शिंदे गटाचे 'हे' संभाव्य मंत्री?

1) उदय सामंत

2) दादा भूसे

3) शंभूराजे देसाई

4) गुलाबराव पाटील

5) तानाजी सावंत

6) दिपक केसरकर

7) भरत गोगावले

8) संजय शिरसाट

9) प्रताप सरनाईक

10) अर्जून खोतकर

11) विजय शिवतारे

11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. त्यातच आता शिंदे गटातील इच्छुकांच्या प्रगतीपुस्तकामुळे सत्तार, राठोडांसह इतर इच्छुकांचीही धाकधूक वाढलीय... मात्र विस्तारापुर्वी पुन्हा लॉबिंग करून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दिग्गज नेते मंत्रिपद पटकावणार की त्यांना मंत्रिमंडळाबाहेर राहावं लागणार? याचीच उत्सुकता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT