Maharashtra CM Seat Formula SaamTv
Video

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीकडून 2 फॉर्म्युला, पाहा Video

Mahayuti Formula For CM Seat : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून खलबत सुरू झालं आहे. यासाठी महायुतीने दोन फॉर्म्युले ठरवले आहेत.

Saam Tv

राज्यातील मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत. यात अडीच - अडीच वर्षाचा पहिला फॉर्म्युला आहे. तर दोन- दोन - एक असा दूसरा फॉर्म्युला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यावर अंतिम निर्णय हा दिल्लीत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचं निश्चित होताच आता राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, एकीकडे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तिन्ही मंत्री दिल्लीत जाणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुढील भूमिका ठरवण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती सूत्रांनी दिली आहे.

पहिला फॉर्म्युला अडीच - अडीच वर्षाचा आहे. यात पहिले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस तर पुढचे अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे. तर दुसऱ्या फॉर्म्युल्यात फडणवीस हे दोन वर्ष, नंतर एकनाथ शिंदे हे दोन वर्ष आणि त्यानंतर अजित पवार हे एक वर्ष मुख्यमंत्री असतील असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Maharashtra Live News Update : मला मंत्रीपद मिळतं म्हणून विरोधकांच मन जळतं - रामदास आठवले

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी

SCROLL FOR NEXT