Beed Political News Saam Tv
Video

Beed Political News : माजलगावच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच ?

Majalgaon Constituensy : माजलगाव मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून महायुतीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. माजलगाव मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये चढाओढ लागली आहे.

Saam Tv

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून महायुतीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. विद्यमान आमदार प्रकाश सोळुंके किंवा जायसिंग सोळुंके यांना उमेदवारी मिळू शकते. तर दुसरीकडे भाजप नेते गोविंदराव जगताप यांचे समर्थक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या जागेसाठी विधानसभेला पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासमोर नव आव्हान उभं राहणार आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. अशातच माजलगाव मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या जागेसाठी भाजप नेते मोहनराव जगताप देखील इच्छुक आहेत. त्यामुळे या जागेचा प्रश्न सोडवणं महायुतीला अवघड जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT