महाविकास आघाडीचं नाशिकमधील जागावाटपाचं सूत्र ठरलं असून नाशिक शहारामधील नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघ ठाकरे गट लढवणार आहे. तर राष्ट्रवादी पूर्व मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी अद्यापही कोणत्याच पक्षाकडून जागावाटपा बाबतर निर्णय झालेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नसली तरी नाशिकमधील जागांबद्दल महाविकास आघाडीचं सूत्र ठरलेलं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यात नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिमची जागा उद्धव ठाकरे शिवसेना गट लढवणार आहे. तर नाशिक पूर्वची जागा शरद पवार गटाकडून लढवली जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. नाशिक पूर्वच्या जागेवर कॉंग्रेसकडून देखील दावा करण्यात आला होता. तर नाशिक पश्चिमवर माकप आणि शरद पवार गटाचा दावा होता. मात्र काल मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नाशिक मध्य मधून वसंत गीते, आणि नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर यांच्या नावाला हिरवा कंदील दिल असल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. दरम्यान, देवळाली, निफाड, इगतपुरीबाबत मविआमधील मित्र पक्षाचे उमेदवार अदलाबदली करून निवडणूक लढवण्याची रणनिती आखली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.