MVA News SaamTv
Video

MVA News : मविआचे बंडखोर माघार घेणार? काय आहे मविआचा प्लॅन, पाहा Video

Rebellion Candidate News : बंडखोरी केलेल्या उमेदवारांचं बंड शांत करण्यासाठी महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातील किती बंडखोर ४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

विधानसभेसाठी बंडखोरी केलेल्या उमेदवारांचं बंड थंड करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. विधानपरिषदेची आमदारकी देतो किंवा महामंडळावर पद देतो, मात्र अर्ज मागे घ्या, असं आश्वासन मविआकडून बंडखोरांना देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या नाराजांची संख्या सध्या वाढली आहे. अशा नाराज बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीत अशा नाराज बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सरकार आल्यावर विधानपरिषदेतील शिल्लक ५ जागेवर आमदारकी देण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्याचबरोबर महामंडळावर देखील पद देण्याबद्दल सांगितलं जात असून अर्ज मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मविआकडून केले जात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. कॉंग्रेसच्या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न रमेश चेन्नीथला, अशोक गहलोत हे करत आहेत. तर राष्ट्रवादीमधील बंडखोर उमेदवारांची समजूत स्वत: शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून काढली जात असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मविआच्या या प्रयत्नाना आता किती यश येईल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT