Youth Congress Protest In Mumbai  Saam Tv
Video

Congress: सरकारला जागं करण्यासाठी युवक काँग्रेसचं आंदोलन; विधानभवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न

Youth Congress Protest In Mumbai : युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले .

Bharat Jadhav

बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था,महिला सुरक्षेचे प्रश्न, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे मुद्द्यांवरून सरकारला जागं करण्यासाठी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या नेत्यांनी हातात बेड्या घालून सरकारविरोधात आंदोलन केलं. विविध मुद्द्यावरून सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हे आंदोलन केलं. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुंबईत युवक काँग्रेसने आक्रोश मोर्चा काढला. पुण्याहून आंदोलनकर्ते मुंबईत आले होते.

आंदोलनकर्त्यांना विधानभवनाला घेराव घालायचा होता. पोलिसांनी विधान भवनाच्या आवारात बॅरिकेड्स लावण्यात आली होती. मात्र कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढून आंदोलन करू लागली होती. मुंबई काँग्रेस भवन कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची गर्दी झाली. MRCC कार्यालय ते मुंबई ते विधानभवनापर्यंत मोठा मोर्चा काढत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. तेव्हा पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT